Home महाराष्ट्र जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन उत्साहात

जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन उत्साहात

District level buyer-seller meet in full swing

अमरावती: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत मेळघाट हाट येथे जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. स्वयंसहाय्य महिला बचतगटांच्या उत्पादीत उत्पादनांना बाजारपेठ व योग्य दर मिळावा, तसेच विक्रीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी संमेलन घेण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, विभागीय सल्लागार केशव पवार, युनिवर्स एक्स्पोर्ट दुबईचे संचालक प्रवीण वानखडे, स्मार्टचे नोडल अधिकारी विवेक टेकाडे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, वर्षा खोब्रागडे, बाळासाहेब झिंझाडे, सहा जिल्हा समन्वय अधिकारी रामगोपाल साहू आदी उपस्थित होते.

डॉ. रंजन वानखेडे यानी मेळघाटमधील कॉफी, मध, खवा, कुटकी व इतर स्थानिक उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळावी. त्यांची विक्री वाढावी, हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. मध्यस्थी टाळून थेट विक्रीला प्राधान्य देणे खरेदीदार-विक्रेत्यांमध्ये थेट संवाद व दीर्घकालीन व्यावसायिक व्यवहार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी सर्व खरेदीदारांनी मेळघाटमधील महिला बचतगटांची उत्पादने पाहून थेट करार करावेत, असे आवाहन केले.

वर्षा खोब्रागडे यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश घ्यार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी परिवर्तन व एकता लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी, मेळघाट हाट येथील कर्मचारी, माविम जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. या संमेलनात नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, हिंगोली, बुलढाणा, वाशीम आदी जिल्ह्यातील खरेदीदार आणि विक्रेते सहभागी झाले.

error: Content is protected !!
Exit mobile version