Home नंदुरबार जिल्हा 2 फेब्रूवारीला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

2 फेब्रूवारीला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

District Level Democracy Day on 2nd February

(नंदुरबार) जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे फेब्रूवारी, 2026 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 02 फेब्रूवारी, 2026 रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर आणि पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कामासबंधी वैयक्तिक तक्रारी/निवेदन सादर करावयास असल्यास प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनात दाखल कराव्यात.

तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल तक्रार/निवेदन यावर समाधान न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार/निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून दाखल करावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version