(नंदुरबार) राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद/नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहिर केला असून 04 नोव्हेंबर 2025 पासून जिल्ह्यात निवडणूकीची आचार संहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अंमलात राहणार असल्याने माहे डिसेंबर महिन्यात सोमवार 01 डिसेंबर, 2025 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
