Home शैक्षणिक जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

District Level Examination Organizing and Monitoring Committee meeting concluded

नंदुरबार | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2025)

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2025) च्या यशस्वी व सुरळीत आयोजनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि सह-अध्यक्ष मा. नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

परीक्षा केंद्रे व परीक्षार्थींचा तपशील:

दिनांक: 23 नोव्हेंबर 2025

ठिकाण: नंदुरबार शहर

सकाळ सत्र: 12 परीक्षा केंद्रे — सुमारे 4,500 परीक्षार्थी

दुपार सत्र: 17 परीक्षा केंद्रे — सुमारे 5,774 परीक्षार्थी

एकूण परीक्षार्थी: 10,274

बैठकीतील प्रमुख मुद्दे:

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मा. कल्पना ठुबे, पोलिस विभागाचे उपअधीक्षक, सहाय्यक कोषागार अधिकारी श्री. जगदिश पाटील, DIET प्राचार्य डॉ. रमेश चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, तसेच परिरक्षक, उपशिक्षणाधिकारी, झोनल अधिकारी, सहाय्यक परिरक्षक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि सर्व परीक्षा केंद्रांचे केंद्रसंचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत खालील विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला:

⦁ परीक्षा सुरक्षेच्या सूचना

⦁ सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त

⦁ गोपनीय साहित्य शासकीय कोषागारामध्ये सुरक्षित ठेवणे

⦁ उमेदवार तपासणीसाठी फिंगरप्रिंट व फेस स्कॅनर अनिवार्य

⦁ सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे कार्यान्वित ठेवणे

⦁ कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी केंद्रसंचालक व परिरक्षकांना विशेष सूचना

परीक्षा व्यवस्थापन:

⦁ परिरक्षक, सहाय्यक परिरक्षक व केंद्रसंचालक यांची नियुक्ती

⦁ आवश्यक कर्मचारी वर्गाची उपलब्धता

⦁ वाहतूक, सुरक्षा व आपत्कालीन परिस्थितीवरील मार्गदर्शन

⦁ झोनल व केंद्रस्तरीय निरीक्षण यंत्रणा अधिक मजबूत करणे

प्रशिक्षण सत्र:

बैठकीदरम्यान सादरीकरणाद्वारे सर्व अधिकाऱ्यांना परीक्षा प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. हे सादरीकरण प्राथमिक शिक्षण विभागातील डॉ. युनूस पठाण यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी रमेश गिरी यांनी केले.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, मा. उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे, आणि मा. प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनीही परीक्षेच्या काटेकोर नियोजनासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

#MAHATET2025#Nandurbar#ExamPreparation#DistrictAdministration#DrMittaliSethi#NamanGoyal

error: Content is protected !!
Exit mobile version