Home नंदुरबार जिल्हा बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी तंत्रज्ञानाधारित उपायांना गती महिला व बालविकास विभागाची जिल्हास्तरीय...

बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी तंत्रज्ञानाधारित उपायांना गती महिला व बालविकास विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

District level review meeting of Women and Child Development Department concludes to accelerate technology-based solutions for child health and nutrition

नंदुरबार,

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीस्तरावरील बालकांचे आरोग्य, पोषण व सेवा वितरण अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हा परिषद नंदुरबार येथील याहा मोगी सभागृहात पार पडली. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय नमन गोयल (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार उपस्थित होते.

बैठकीस जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) तसेच पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. बैठकीत नोव्हेंबर 2025 मध्ये अंगणवाडीतील बालकांची महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग) बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तपासणीतील निष्कर्षांचे विश्लेषण करून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.

कुपोषित बालकांवर प्रभावी व सातत्यपूर्ण लक्ष ठेवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या Nurture Application च्या माध्यमातून SAM बालकांचे End-to-End Tracking कसे करावे याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच स्थलांतरित लाभार्थ्यांची माहिती संकलन, ट्रॅकिंग व सेवा वितरणासाठी विकसित Maha-MTS Application च्या वापरावरही भर देण्यात आला.

यासोबतच पोषण ट्रॅकर, अंगणवाडी केंद्रांची सद्यस्थिती, नवीन अंगणवाडी बांधकाम व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विभागांमध्ये समन्वय ठेवून बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “डेटा-आधारित कामकाजामुळे सेवांची गुणवत्ता वाढेल आणि कुपोषण निर्मूलनाच्या प्रयत्नांना वेग मिळेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ही बैठक जिल्ह्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची ठरली असून तंत्रज्ञान, समन्वय आणि वेळबद्ध अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.

#Nandurbar#DrMitaliSethi#WomenAndChildDevelopment#Anganwadi#ChildHealth#NutritionMission#NurtureApp#MahaMTS#PoshanTracker#DistrictAdministration#GoodGovernance

error: Content is protected !!
Exit mobile version