Home नंदुरबार जिल्हा काय आहे खासदार डॉ.हिना गावित यांची अनोखी टिफिन बैठक ?

काय आहे खासदार डॉ.हिना गावित यांची अनोखी टिफिन बैठक ?

(धडगाव) नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉ.हिनाताई गावित या सातत्याने आपल्या मतदार संघात विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित असतात. सध्या विविध योजना अंतर्गत वस्तु वाटपाचे कार्यक्रम जिल्हाभर सुरु आहेत.जिल्ह्याच्या काना-कोपर्‍यातील खेड्यापाड्यात त्यांचे कार्यकर्ते विखुरलेले आहेत.दिवसभराच्या धावपळीच्या व अत्यंत व्यस्त अश्या शेड्युल मध्ये त्यांचा दुपारच्या भोजनाचा प्रसंग हा आपल्या याच कार्यकर्त्यांसोबत ठरलेला असतोच. नुकत्याच त्यांच्या धडगाव दौर्‍यातील त्यांना आलेले अनुभव त्यांनी आपल्या सोशल मिडियाद्वारे शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्ट द्वारे त्यांच्या संवेदनशील मनाचे आणि सामान्य कार्यकर्त्यांसोबतचे असलेले भावबंध त्यांनी आपल्या सहज सोप्या भाषेत व्यक्त केले आहेत. नेमकी त्यांची ही व्हायरल होत असलेली पोस्ट खास “नंदुरबार न्युज”च्या वाचकांसाठी जशीच्या तशी…………

नेमकी ही ‘टिफिन बैठक’ काय आहे ?, हे जाणुन घेऊया… थेट खासदार डॉ.हिनाताई गावित यांच्याच शब्दात…..

“परवा दुपारी धडगाव तालुक्याच्या मोठी सुरवाणी या गावांमधल्या एका पाड्यावर जाऊन त्या पाड्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांसोबत ‘टिफिन बैठक’ आयोजित केली होती. पार्टीचे सगळे कार्यकर्ते, त्या बूथ मधले आणि धडगाव तालुक्यातले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते यांच्यासोबत या ठिकाणी टिफिन बैठक केली.

खूप छान अनुभव या टिफिन बैठकीच्या निमित्ताने आला. एका पाड्यावर एका लाकडाच्या शेड खाली, निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आम्ही आपापल्या घरून टिफिन बांधून सर्व कार्यकर्ते आणि मी आले होते. अतिशय निसर्गरम्य, हलक्या फुलक्या अशा वातावरणामध्ये ही बैठक पार पडली. हा अत्यंत आगळावेगळा असा अनुभव आमच्यासाठी सुद्धा होता कारण धडगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची टिफिन बैठक घेण्यात आली होती.

एरवी आम्ही पक्ष, प्रशासन, कार्यकर्ते, अधिकारी या सगळ्यांबरोबर बैठका करत असतो पण त्यात एक औपचारिकता असते आणि त्यामुळे त्या बैठकीतून काम होत असलं तरीही या टिफिन बैठकीने आम्हाला एक वेगळा आनंद दिला. कारण अशा वातावरणात अशी अनौपचारिक बैठक सगळ्याच कार्यकर्त्यांना एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. घरून आणलेले डबे एकमेकांच्या सोबत वाटून खाल्ल्याने त्यात एक प्रकारचा एकोपा निर्माण होतो आणि मला तर शाळेतल्या दिवसांचीच आठवण झाली.

एरवी मी ऑफिस, गाडी, ट्रेन, बस जिथे मिळेल तिथे जेवणाच्या वेळेला डबा खात असते पण आपल्या सगळ्या जवळच्या कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो… तोही अशा सुंदर वातावरणात!!

ढग भरून आलेले असताना सगळीकडे हिरवं गार झालेलं असताना माझ्या जिल्ह्याच्या एका टोकाला निसर्गाचा वरदहस्त असलेल्या गावात ही टिफिन बैठक फार वेगळी ऊर्जा देऊन गेली.

या कार्यक्रमाला माझ्यासोबत सुप्रियाताई गावित आणि इतर सर्व पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जवळपास 70 लोक या बैठकीला या टिफिन बैठकीला आपल्या घरून टिफिन घेऊन उपस्थित होते.

आगामी काळात करण्याच्या कामांना या आगळ्यावेगळ्या बैठकीमुळे निश्चितच मोठा लाभ होणार आहे. टिफिन बैठकी वरून परत येत असताना मनात एक वेगळाच उत्साह होता. आणि फक्त माझ्याच नव्हे तर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तो मला दिसत होता, ही फार महत्त्वाची बाब आहे.

या अनौपचारिक बैठकीमुळे आम्ही कार्यकर्ते एकमेकांशी अधिक जोडले गेलो असं मला वाटतं आणि त्यातून आगामी काळात खूप जोरदारपणे काम आपापल्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते करतील अशी खात्रीही मला वाटते आहे.”

——डॉ.हिनाताई गावित

#TiffinBaithak#Outsidemeeting#Nature#drsupriyagavit#DrVijaykumarGavit#DrHeenaGavit#BjpIndia#BJP#dhadgaon

error: Content is protected !!
Exit mobile version