
सावरपाडा (ता. तळोदा)
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PMRKVY) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (Rainfed Area Development – RAD) अभियान 2025-26 च्या अनुषंगाने सावरपाडा, ता. तळोदा येथे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणात उप कृषी अधिकारी भरत माळी, सहाय्यक कृषी अधिकारी मदन कायत व प्रशांत वळवी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत सरपंच श्री. महेंद्र वळवी आणि लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RAD हा कोरडवाहू शेती क्षेत्रात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम असून त्याची मुख्य उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
पूरक व्यवसायांना चालना:
RAD अभियानांतर्गत पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते. समूह आधारित (Cluster-based) दृष्टिकोनातून निवडक शेतकऱ्यांना अनुदान देऊन एकात्मिक शेती पद्धती अंमलात आणली जाते. अल्प व अत्यल्प भूधारक तसेच महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने राबवली जात असून, राज्याच्या भौगोलिक परिस्थिती व गरजेनुसार योजनेत लवचिकता ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला त्यांच्या विशिष्ट गरजेनुसार कृषी विकास योजना आखण्यास मदत होते.
#PMRKVY#RAD#RainfedAgriculture#Nandurbar#Taloda#AgricultureDevelopment#FarmerTraining#SustainableFarming