Home शैक्षणिक ग्रामविकास मंडळ येळवणतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न

ग्रामविकास मंडळ येळवणतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न

0
Educational materials distributed to students and a teacher appreciation ceremony held by Gramvikas Mandal, Yelvan.

ग्रामविकास मंडळ येळवणतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील येळवण ग्रामविकास मंडळामार्फत नुकताच शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दिपक जाधव होते. व्यासपीठावर येळवणच्या सरपंच सौ. दिपाली जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक मटकर, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, पोलीस पाटील शुभदा सकपाळ, शाळा व्यवस्थापन समिती येळवण नं. 1 अध्यक्षा सौ. सुगंधा बाईत, समितीचे उपाध्यक्ष अनंत साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. येळवण हायस्कूलमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या शिक्षकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक जाधव यांनी सांगितले. यावर्षी पटसंख्येअभावी येळवण हायस्कूल शून्य शिक्षकी झाल्याने येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे तालुक्यातील इतर हायस्कूलमध्ये समायोजन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे येळवणमध्ये काम करणाऱ्या शिक्षिका सौ. श्वेता बाणे, शिक्षक गणेश बरडे, किरण पवार, कर्मचारी वृंद सौ. शैला गोरे, श्रीमती माधवी मसुरकर, लिपिक श्रीमती अनुजा पवार यांचा शाल श्रीफळ देऊन येथोचित गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद येळवण नं. 1 चे शिक्षक विशाल घोलप यांची ओझरच्या केंद्र्प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांचाही तसेच येळवण हायस्कूलचे माजी शिक्षक व सौंदळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संभाजी केळुसकर यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता 10 वीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेले विद्यार्थी कु. अनुष्का लाड 83.83 टक्के, मंथन आयरे 67.20 टक्के, पियुष तरळ 63.60 टक्के यांचा विशेष भेटवस्तू व रोख बक्षिस देऊन  गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष अनंत साळवी यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खल्ले यांनी केले. या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी अशोक चाळके, मोहन सकपाळ, अनंत मालप, विकास फाकांडे, विठोबा चव्हाण, सुभाष चव्हाण, मारुती आमटे, रविकांत शिर्के, अंगणवाडी सेविका रिया तरळ आदी मान्यवर मंडळी तसेच शाळेतील विध्यार्थी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.