नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि Eklavya India Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘एकलव्य करिअर मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा उद्देश ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा आहे.
दिनांक: शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५
कार्यक्रमात Eklavya India Foundation चे संस्थापक आणि Chevening Scholar श्री. राजू केंद्रे विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत देशभरातील हजारो ग्रामीण, आदिवासी आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना TISS, DU, IIT, अजीम प्रेमजी विद्यापीठ तसेच परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले आहे.
मेळाव्यातील प्रमुख मुद्दे:
⦁ विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विविध करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन
⦁ देश-विदेशातील उच्च शिक्षण संस्थांबाबत माहिती
⦁ शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया आणि करिअर नियोजनाचे टप्पे
⦁ प्रेरणादायी संवाद आणि प्रश्नोत्तर सत्र
सहभागी कोण होऊ शकतात:
सध्या अकरावी व बारावीमध्ये शिकणारे विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.
नोंदणी आवश्यक –
जागा मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करावी.
नोंदणीसाठी येथे क्लिक करा:
https://forms.gle/UaSJwcjVUGDDsAJ56
या मेळाव्याच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरविण्याची अनोखी संधी मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाचे हे उपक्रम शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरणार आहेत.
‘ज्ञानाच्या दिशेने पहिले पाऊल – एकलव्य शिक्षण मेळाव्यातून!’
#EklavyaCareerMela#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#CareerGuidance#EducationForAll#RajuKendre#EklavyaIndiaFoundation#CareerOpportunities#StudentsEmpowerment#YouthForChange
