Home शैक्षणिक एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुल प्रवेश परीक्षा 1 मार्च रोजी होणार

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुल प्रवेश परीक्षा 1 मार्च रोजी होणार

Eklavya Model Residential Public School entrance exam will be held on March 1

(नंदुरबार) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता 6 वी साठी नियमित प्रवेश आणि इयत्ता 7 वी ते 9 वी मधील रिक्त जागांसाठी रविवार, 01 मार्च 2026 रोजी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रवेश तपशील

• परीक्षेची तारीख व वेळ: 01 मार्च २०२६, सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत.

• इयत्ता ६ वी साठी वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी १.०० पर्यंत.

• इयत्ता ७ वी ते ९ वी साठी वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत.

• प्रवेश क्षमता: प्रत्येक एकलव्य शाळेत इयत्ता ६ वी साठी ३० मुले आणि ३० मुली अशी एकूण ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे.

• पात्रता:

• विद्यार्थी अनुसूचित/आदिम जमातीचा (S.T.) असणे बंधनकारक आहे.

• विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹ ६ लाखांपेक्षा कमी असावे.

• शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी किंवा ८ वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अनुक्रमे इयत्ता ६ वी, ७ वी, ८ वी किंवा ९ वी करिता प्रवेशास पात्र असतील.

परीक्षा केंद्र (तालुक्यानुसार)

• अक्कलकुवा तालुका: शासकीय आश्रमशाळा, तालंबा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार.

• धडगांव तालुका: शासकीय आश्रमशाळा, सलसाडी, ता. तळोदा, जि. नंदुरबार .

• तळोदा तालुका: शासकीय आश्रमशाळा, अलिविहीर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार

अर्ज प्रक्रिया

• अर्ज करण्याची अंतिम मुदत: २० फेब्रुवारी २०२६.

• अर्ज कुठे मिळतील/स्विकारले जातील: अर्ज प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे तसेच एकलव्य शाळा सलसाडी, अलिविहीर व तालंबा येथे उपलब्ध असती. प्रकल्प कार्यालयात अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

• अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे: जन्म दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, पालक व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जातीचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती.

परीक्षेसाठी सूचना

• विद्यार्थ्यांनी सकाळी ९.०० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे.

• आवश्यक साहित्य: स्वतःचे आधार कार्ड, निळा पेन, पेपर पॅड आणि पाण्याची बॉटल.

• मनाई असलेले साहित्य: बॅग, पुस्तके, मोबाईल, डिजिटल घड्याळ किंवा इतर कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास परवानगी नाही.

प्रवेश प्रक्रिया व प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यालयाशी संपर्क साधता येईल, असेही प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version