Home महाराष्ट्र कार्यालयीन जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासण्यावर भर द्या

कार्यालयीन जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासण्यावर भर द्या

Emphasize on cultivating sportsmanship to effectively fulfill office responsibilities.

नागपूर : राज्यातील सुमारे 14 कोटी जनतेचा मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही महसूल विभागावर आहे. नैसर्गिक आव्हानांपासून ते शासकीय पातळीवर आवश्यक असणाऱ्या सर्व महत्वपूर्ण दस्तऐवजीकरणाची जबाबदारी गावपातळीपासून जिल्हापातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. आपल्याला देण्यात आलेले शासकीय कर्तव्य लोकाभिमुख व पारदर्शीपणे पूर्ण करता आले पाहिजे. कार्यालयीन कामे कालमर्यादेत होण्यासाठी वेळेचे प्रभावी व्यवस्थापनासमवेत खिलाडूवृत्ती जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

रवी नगर येथील नागपूर विद्यापीठ क्रीडा संकुल येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ.माधवी खोडे-चौरे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना अर्धन्यायिक अधिकार दिलेले आहेत. स्वाभाविकच सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा या वेळेत न्याय मिळावा यादृष्टीने असतात. यात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येकाला अधिकारांचे वाटप प्रशासनाने केले आहे. मोठ्या प्रमाणात आपण पदोन्नती दिल्या. यात एकाही अधिकाऱ्याला मंत्रालयात यावे लागले नसून त्यांच्या कामातील गुणवत्ता लक्षात घेऊन या पदोन्नत्या केल्याचे त्यांनी सांगितले. एखादा तहसिलदार हा महसूल विभागाच्या प्रमुख पदापर्यंत येण्याची सकारात्मकता तहसिलदारांनी बाळगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

विविध नैसर्गिक आव्हानातून निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाच्या सकारात्मक प्रत्यय देण्यासह प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या सकारात्मक प्रत्यय मिळावा यासाठी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी सतत कर्तव्यतत्पर असतात. अतिवृष्टी असो, दुष्काळ असो, पाणीटंचाई असो, पिकपंचनामे असो सर्व पातळीवर महसूल विभागाला तत्पर राहावे लागते. या कार्यतत्परतेतूनच लोकाभिमूख प्रशासनाचा सर्वसामान्यांना प्रत्यय येतो. असंख्यवेळा महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी हे अत्यंत ताणतणावातून जात असतात. त्यावर जर मात करायची असेल तर क्रीडा कौशल्याची जोपासणा करुन आरोग्यासाठी थोडा वेळ काढण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

स्पर्धेचा प्रारंभ ४०० मीटर धावणे या स्पर्धेपासून करण्यात आला. यावेळी नागपूर विभागातील पथसंचलनात नागपूर जिल्हा प्रथम, चंद्रपूर द्वितीय तर वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर आला. 22 फेब्रुवारी चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 1 हजार 250 वरीष्ठ अधिकारी कर्मचारी सहभाग घेणार आहेत. कबड्डी पासून हॉलीबॉलपर्यंत व बॅडमिंटन पासून टेबलटेनिस पर्यंत सुमारे 75 खेळांसाठी या स्पर्धा होत असून सुमारे 500 महिला अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version