Home शेती आधारभूत किमतीत धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

आधारभूत किमतीत धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

Farmers should register online to purchase food grains at support price

(नंदुरबार) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक प्रादेशिक कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने रब्बी पणन हंगाम 2024-25 मध्ये धान, ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्याची किमान आधारभूत किमतीत खरेदी केली जाणार असून या खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा पवार यांनी एका शाासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ऑनलाईन नोंदणी 02 एप्रिल 2025 पासून सुरु असून नोंदणीची शेवटची मुदत 30 एप्रिल 2025 आहे. नोंदणीसाठी रब्बी पणन हंगाम 2024-25 चा सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक आवश्यक आहे. रब्बी पणन हंगाम 2024-25 मधील आधारभूत किंमत खरेदीयोजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावी, असेही श्रीमती पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version