Home नंदुरबार जिल्हा आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या मालमत्तेच्या जलद वितरण मोहिमेचा नंदुरबारमध्ये शुभारंभ

आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या मालमत्तेच्या जलद वितरण मोहिमेचा नंदुरबारमध्ये शुभारंभ

Fast-track distribution campaign for unclaimed assets in the financial sector launched in Nandurbar

‘आपला पैसा, आपला अधिकार’ या ब्रीदवाक्याखाली आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या (Unclaimed Assets) मालमत्तेचे नागरिकांपर्यंत कार्यक्षम व जलद वितरण व्हावे, या उद्देशाने आयोजित विशेष मोहिमेचा शुभारंभ मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नंदकुमार पैठणकर, LDM, नंदुरबार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मा. श्री. नमन गोयल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची रूपरेषा व मोहिमेची पार्श्वभूमी श्री. विशाल गोंडके, मॅनेजर (MGR), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी स्पष्ट केली. त्यांनी बँक खाती, विमा, शेअर्स, मुदत ठेवी आदी आर्थिक साधनांमधील दावा न केलेल्या रकमेबाबत माहिती देत, उपस्थितांना आपले हक्क जाणून घेऊन संबंधित दावा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले.

श्री. संतोष कुमार सोनी, सहाय्यक महाव्यवस्थापक व प्रादेशिक व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी मार्गदर्शन करताना, बँकिंग प्रणालीत पारदर्शकता व नागरिकांच्या पैशांचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले.

श्री. नमन गोयल यांनी नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या असून, दावा न केलेली मालमत्ता योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप श्री. तुषार सेलोकर यांनी आभार प्रदर्शनाने केला.

या मोहिमेमुळे नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पैशाबाबत जागरूकता निर्माण होऊन, आर्थिक क्षेत्रातील विश्वास व पारदर्शकता अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

(Collector Office Nandurbar)

#UnclaimedAssets#FinancialInclusion#FinancialAwareness#RBI

error: Content is protected !!
Exit mobile version