(नंदुरबार) एक भव्य वित्तीय समावेशन जनजागृती शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. या शिबिराचा उद्देश नागरिकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढवणे तसेच विविध बँकिंग सेवा आणि शासन पुरस्कृत योजना उपलब्ध करून देणे हा होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे महाव्यवस्थापक श्री. रजनीश सिंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शिबिराची वैशिष्ट्ये:
नंदुरबार शहरातील १४ अग्रगण्य बँकांनी सहभाग नोंदवून स्वतंत्र स्टॉल उभारले. येथे नवीन खाते उघडणे, Re-KYC, नामनिर्देशन सेवा तसेच सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने या शिबिरासाठी मोबाईल एटीएम व किऑस्क सुविधा उपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल गोंडके, LDO, RBI यांनी केले.
शिबिरातील प्रमुख कामगिरी:
⦁ प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY): ५३ नोंदणी
⦁ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY): ७९ नोंदणी
⦁ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY): ६६ नोंदणी
⦁ अटल पेन्शन योजना (APY): १५ नोंदणी
⦁ Re-KYC अपडेट्स: ११४५ प्रकरणे पूर्ण
⦁ नामनिर्देशन नोंदणी: ८ प्रकरणे पूर्ण
या कार्यक्रमास जिल्हा व प्रादेशिक स्तरावरील वरिष्ठ बँक अधिकारी उपस्थित होते:
⦁ श्री. वीरेंद्र मचरला, उपमहाव्यवस्थापक, SBI
⦁ श्री. प्रभात कुमार, उपमहाव्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिया
⦁ श्री. प्रविणकुमार सिंह, झोनल मॅनेजर, BOM व SLBC प्रतिनिधी
⦁ श्री. संतोषकुमार सोनी, प्रादेशिक व्यवस्थापक, SBI
⦁ श्री. सचिन एन. देशमुख, AGM व प्रादेशिक प्रमुख, BOB
⦁ श्री. गणेश पी. कुलकर्णी, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक
⦁ श्री. एस. के. सिन्हा, AGM व झोनल मॅनेजर, BOI
⦁ श्री. महेश सोनवणे, AGM, ICICI बँक
⦁ सौ. सुमिता शंकर, AGM, सेंट्रल बँक ऑफ इंडिया
⦁ श्री. टी. श्रीधर, AGM, कॅनरा बँक
वित्तीय समावेशन जनजागृती शिबीर २०२५ हे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरले असून, वित्तीय साक्षरता वाढवणे व सर्वसमावेशक विकास साधणे या दृष्टीने एक मोठे पाऊल मानले जात आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

#FinancialInclusion#nandurbar#economicawareness#DigitalIndia#PMJDY#PMSBY#PMJJBY#APY#InclusiveGrowth#NandurbarUpdates