Home सरकारी योजना विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या...

विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचाही समावेश करण्यात येणार

0
Four folk art forms—Naman Khel, Jakhadi, Vahi Gayan, and Zhadipatti—will also be included in the existing folk art grant scheme.

प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे वार्षिक १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली.

विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली असता मंत्री ॲड.शेलार यांनी ही घोषणा केली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही सहभाग घेतला.

#विधानसभालक्षवेधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील एफ/दक्षिण विभागातील भूखंडावर अनधिकृतपणे हॉटेल सुरु असून, मालमत्ता कर थकित असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित इमारतीचे सुरू असलेले बांधकाम तातडीने स्थगित करण्याचे निर्देश महानगरपालिकेला देण्यात येतील. तसेच हॉटेल बंद करण्यासाठीही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

सदस्य अजय चौधरी यांनी मुंबई महानगर पालिकेच्या एफ/दक्षिण विभागामध्ये पवनपुत्र गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प मे.जी.आर.एस.शेल्टर्स या विकासकासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य राम कदम यांनीही सहभाग घेतला.

#विधानसभालक्षवेधी

ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक त्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने यापूर्वीच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाणी स्रोताजवळ जागा उपलब्ध नसल्यास ग्रामपंचायतीच्या अन्य जागेवर सौर प्रकल्प उभारून निर्मित होणारी वीज पाणीपुरवठा योजनेच्या वीजमीटरशी जोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

विधानसभा सदस्य सत्यजित देशमुख यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य प्रशांत बंब, जयंत पाटील, नितीन राऊत यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

#विधानसभा

#पावसाळीअधिवेशन२०२६