Home लाईफस्टाईल शैक्षणिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू!

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू!
Free admission process for junior college students at Dr. Babasaheb Ambedkar Government Hostel has begun!

(नंदुरबार) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह धर्मराज नगर, नंदुरबार येथे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतीगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग , इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग आणि अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

वसतीगृहात मिळणाऱ्या मोफत सोयी-सुविधा:

शासनातर्फे प्रवेशित विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे दर्जेदार व उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात:

• निवास व्यवस्था: राहण्यासाठी सुसज्ज इमारत असून प्रत्येक खोलीत पंखे, लाईट, वॉशिंग बेसिन, स्वच्छ शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था आहे. पालकांसाठी अभ्यागत कक्ष आणि गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक गीझरची सोय आहे.

• भोजन व आहार: विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता आणि 2 वेळेस पोटभर जेवण दिले जाते. आहारात दूध, अंडी, फळे, सॅलड, पापड, लोणचे आणि आठवड्यातून दोनदा चिकन, मटण व गोड पदार्थांसह ‘फिस्ट’ दिले जाते. तसेच पिण्यासाठी वॉटर फिल्टरची सोय आहे.

• अंथरूण-पांघरूण: प्रत्येक विद्यार्थ्याला पलंग, गादी, बेडशीट, उशी, चादर, ब्लँकेट आणि सतरंज्या यांसारखे स्वच्छ साहित्य मिळते.

• थेट बँक खात्यात आर्थिक लाभ: विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दरमहा ₹600 निर्वाह भत्ता, शालेय गणवेशासाठी ₹2,000, गमबूट व छत्रीसाठी ₹500, सहलीसाठी ₹2,000, स्टेशनरीसाठी सरासरी ₹1,800 आणि प्रकल्प अहवालासाठी ₹1,000 जमा केले जातात.

• वाचनालय व अभ्यासिका: स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक पुस्तके, कथा-कविता संग्रहांची मोठी लायब्ररी असून रोज 5 वृत्तपत्रे उपलब्ध असतात.

• इतर सुविधा: वसतीगृहात आधुनिक व्यायाम साहित्य, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एलईडी टी.व्ही., क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, चेस, कॅरम यांसारखे क्रीडा साहित्य उपलब्ध आहे.

• आरोग्य व सुरक्षा: विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी केली जाते आणि सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

अर्ज कसा व कधी करावा ?

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे.

• अर्ज भरण्याची सुरुवात: 15 जुलै 2026

• अंतिम मुदत: 31 जुलै 2026

अधिक माहितीसाठी संपर्क: प्रवेशासंदर्भात अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी गृहपाल व्ही. एन. गिरासे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह, धर्मराज नगर, नंदुरबार यांच्याशी 9022693551 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here