Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथे मोफत अस्थिव्यंग (दिव्यांग) सुधारक शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

नंदुरबार येथे मोफत अस्थिव्यंग (दिव्यांग) सुधारक शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

Free corrective surgery camp for the disabled organized in Nandurbar

ते १४ वयोगटातील अस्थिव्यंग (दिव्यांग) बालकांसाठी मोफत तपासणी व सुधारक शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर जिल्हा रुग्णालय, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात येत असून, (RBSK) – राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, देवनार, कॉन्हेंटरी फोनिक्स, ठाणे हिल्स, ठाणे ग्रीन सिटी, ठाणे डाऊनटाऊन, नंदनगरी तसेच डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर राबविण्यात येत आहे.

शिबीराची रूपरेषा:

दिनांक ०३/०१/२०२६ रोजी ० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांची पूर्व तपासणी

तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांच्या मोफत सुधारक शस्त्रक्रिया दिनांक २३/०१/२०२६ रोजी

सर्व शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे मोफत करण्यात येणार

शिबीराची वैशिष्ट्ये:

लंडन व मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत शस्त्रक्रिया

कोणत्याही जिल्ह्यातील ० ते १४ वयोगटातील अस्थिव्यंग बालकांसाठी तपासणी, उपचार व मार्गदर्शन

शस्त्रक्रियेनंतर २१ दिवसांनंतर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत पुनर्तपासणी

मागील शिबिरांमधून आतापर्यंत ३,५०० हून अधिक यशस्वी अपंगत्व निवारण शस्त्रक्रिया

नोंदणी व संपर्क:

तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया सर्व पूर्णपणे मोफत असून, अधिकाधिक गरजू बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

श्री. मनोहर ढीवरे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक, नंदुरबार) – 9049705029

श्री. जय गुजराथी – 9822507674

डॉ. दुर्गेश शाह – 9423940500

डॉ. नितीन पंचभाई – 8888085005

श्री. संतोष वसईकर – 9423486296

श्री. सुनिल चौधरी – 9923191809

error: Content is protected !!
Exit mobile version