Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी

नंदुरबार जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी

नंदुरबार

(नंदुरबार) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी 24 ऑगस्ट 2023 रोजी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. (Nandurbar News)

नंदुरबार : वाहनचालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी (Nandurbar)

नंदुरबार शहरातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नगरपरिषदेजवळ सकाळी 10-30 ते दुपारी 4-00 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनचालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा व आपली आरोग्य व नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही श्री. बिडकर यांनी केले आहे.

#nandurbar #nandurbarnews #nandurbardistrict #आदिवासी #नंदुरबार_जिल्हा #नंदुरबार

नंदुरबार
error: Content is protected !!
Exit mobile version