Home नंदुरबार नंदुरबार तालुक्यातील मांडळ मंडळातील मौजे बलवंड, खर्दे खुर्द आणि रजाळे या गावातील...

नंदुरबार तालुक्यातील मांडळ मंडळातील मौजे बलवंड, खर्दे खुर्द आणि रजाळे या गावातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपास प्रारंभ!

Free sand distribution has begun for the beneficiaries of the Gharkul scheme in the villages of Balwand, Kharde Khurd and Rajale in Mandal Mandal of Nandurbar taluka!

मा. डॉ. विजय कुमार गावित विधानसभा सदस्य, नंदुरबार मतदारसंघ यांच्या हस्ते नंदुरबार शुभारंभ करण्यात येऊन तालुक्यातील मांडळ मंडळातील मौजे बलवंड, खर्दे खुर्द आणि रजाळे येथील पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप करण्यासाठी पासेस वितरित करण्यात आले.

शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेली वाळू नियोजनबद्ध व पारदर्शक प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रशासनाकडून ऑनलाईन/ऑफलाईन पासेसच्या माध्यमातून वाळू वितरण

गावपातळीवर लाभार्थ्यांना थेट फायदा

घरकुल स्वप्न साकार होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

सदर कार्यक्रमास मा. डॉ. विजय कुमार गावित विधानसभा सदस्य, नंदुरबार मतदारसंघ, मा. सुप्रिया विजयकुमार गावित, माजी जि. प. अध्यक्ष, मा.श्री. मिलिंद कुलथे, तहसीलदार नंदुरबार, श्री. संजय पाटील, सरपंच बलवंड, श्री. राजू पाटील, सरपंच, रजाळे व श्री. नितीन पाटील, सरपंच, खर्दे खुर्द ग्रामपंचायत, मंडळ अधिकारी, मांडळ ग्राम महसूल अधिकारी, खर्दे खुर्द आणि रजाळे हे उपस्थित होते.

लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त; करत “सरकारच्या या उपक्रमामुळे आमचं घर आता खरंच पूर्ण होणार आहे!” अशी आशा व्यक्त केली आहे..

#HousingForAll#FreeSandDistribution#GovernmentInitiative#RuralDevelopment#Nandurbar#GharKulYojana#EmpoweringVillages#SandPassDistribution#KardeKhurd#NandurbarConstituency

error: Content is protected !!
Exit mobile version