Home तळोदा ‘स्वच्छतेकडून सुंदरतेकडे’ — तळोदा तालुक्यातील शाळांचा अनुकरणीय परिवर्तन प्रवास

‘स्वच्छतेकडून सुंदरतेकडे’ — तळोदा तालुक्यातील शाळांचा अनुकरणीय परिवर्तन प्रवास

'From cleanliness to beauty' — An exemplary transformation journey of schools in Taloda taluka

‘स्वच्छ आणि सुंदर शाळा म्हणजेच निरोगी, आनंदी आणि सक्षम विद्यार्थी!’ याच ध्येयाने तळोदा तालुक्यात ‘स्वच्छतेकडून सुंदरतेकडे’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. मुख्यकार्यकारी अधिकारी नमन गोयल, मा. शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या प्रेरणेने, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, विस्तार अधिकारी आरती शिंपी, वसंत जाधव व ज्ञानदेव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत शाळांना अधिक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि शिक्षणास पोषक बनविण्यावर भर देण्यात आला आहे.

उपक्रमाचे प्रमुख घटक-

१) शालेय स्वच्छता: स्वच्छ वर्गखोल्या – स्वच्छ विचार

⦁ वर्गखोल्या, किचनशेड, शौचालयाची नियमित साफसफाई

⦁ कचरा कुंडीचा योग्य वापर

⦁ हवेशीर खिडक्या, सूर्यप्रकाशाची पुरेशी उपलब्धता

यामुळे विद्यार्थी शाळेत अधिक आनंदाने व सुरक्षित वातावरणात वेळ घालवतात.

२) विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता:

⦁ केस व नखे स्वच्छ ठेवणे

⦁ स्वच्छ गणवेश

⦁ हात धुवा उपक्रम

⦁ नाक–कान स्वच्छता

यामुळे आरोग्य सुधारते आणि आजारांची शक्यता कमी होते.

३) नयनरम्य शैक्षणिक वातावरण:

⦁ रंगीत भिंती आणि शैक्षणिक भित्तीचित्रे

⦁ हिरवळयुक्त बाग

⦁ प्रकाशमान व सुरक्षित परिसर

⦁ क्रीडांगण व खेळ साहित्य

या सर्वांमुळे मुलांची शाळेशी नाळ जुळते आणि शिकण्याची गुणवत्ता वाढते.

अनुकरणीय ठरलेल्या शाळा-

१) जि.प. उच्च प्राथमिक शाळा, गणेश बुधावल (ता. तळोदा)

गावकऱ्यांच्या मदतीने शाळेचा पूर्ण कायापालट — मोठे मैदान, सुंदर परिसर, वृक्षराजी आणि खेळ साहित्य. मंगलसिंग पाटील (उपसरपंच), SMC अध्यक्ष मंगलसिंग पाडवी, मुख्याध्यापक राजुभैय्या गुरव आणि काकुस्ते सर यांचे मोलाचे योगदान उल्लेखनीय.

२) जि.प. शाळा, राणापूर (ता. तळोदा)

निसर्गरम्य, स्वच्छ वातावरण आणि 100% उपस्थिती! परिपाठातून रोज स्वच्छतेच्या सवयी. मुख्याध्यापक आबा आखाडे व चौरे सर यांची प्रभावी अंमलबजावणी.

३) जि.प. शाळा, कढेल (ता. तळोदा)

आकर्षक प्रवेशद्वार, भाषा–गणित–इंग्रजीचे शैक्षणिक भित्तीचित्र, परसबाग, स्वच्छता मॉनिटर. मुख्याध्यापक राजश्री पाटील, अर्चना वळवी व SMC सदस्यांचे योगदान.

४) जि.प. शाळा, चौगाव बु. (ता. तळोदा)

रंगीत भिंती, वाचन कोपरे, शैक्षणिक भित्तीपत्रके — मुलांचे लक्ष वेधणारी शाळा! मुख्याध्यापक योगेश पाटील व टीम यांची एकत्रित मेहनत.

५) जि.प. शाळा, सावर (ता. तळोदा)

हात धुवा प्रात्यक्षिक, स्वच्छ गणवेश, कचरावर्गीकरण, मानसिक–भावनिक स्वच्छतेवर भर. मुख्याध्यापक राजेंद्र चौरे यांची विशेष मेहनत.

उपक्रमाचे ठळक फायदे:

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ

मुलांचे आरोग्य सुधारले

पालकांचा शाळेबद्दल विश्वास वाढला

स्वच्छ वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण

मुलांमध्ये अनुशासन व मूल्यशिक्षणाचे नैसर्गिक रूजवन

गावकऱ्यांमध्ये शाळेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन

‘स्वच्छतेकडून सुंदरतेकडे’ या उपक्रमाने तळोदा तालुक्यातील शाळांना एक नवे रूप दिले आहे. स्वच्छ, सुबक, हिरवळयुक्त आणि आकर्षक शाळा म्हणजेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा भक्कम पाया. ही संकल्पना केवळ स्वच्छतेपुरती नसून — गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य आणि संस्कार यांपर्यंत पोहोचलेली सर्वांगीण मोहीम आहे.

[Rural Education, Maharashtra Education, Nandurbar]

Zilla Parishad, Nandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version