Home शहादा शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; “अॅग्रीस्टॅक” ओळखपत्र नोंदणीला जिल्ह्यात वेग !

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; “अॅग्रीस्टॅक” ओळखपत्र नोंदणीला जिल्ह्यात वेग !

Golden opportunity for farmers; “Agristack” identity card registration accelerates in the district!

ेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती ! अॅग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार आणखी सोपे !

शहादा तहसिलदार दीपक गिरासे यांनी आवाहन केले की, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर “अॅग्रीस्टॅक” ओळखपत्रासाठी नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.

दष्टिक्षेपात जिल्ह्यातील नोंदणी…

#शहादा ४,१७५ शेतकरी

#नंदुरबार १,८४० शेतकरी

#नवापूर ३,२५६ शेतकरी

#अक्राणी ५२६ शेतकरी

#अक्कलकुवा ८०९ शेतकरी

#तळोदा १,३१७ शेतकरी

जिल्ह्यातील एकूण १२,९२३ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे.

शहादा तालुक्यातील ५६,०५६ शेतकऱ्यांपैकी ४,१७५ शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी केली आहे. तुमची झाली का?

अॅग्रीस्टॅक ओळखपत्राचे फायदे:

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक

पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्जासाठी अनिवार्य

आपत्ती व्यवस्थापन, हमीभाव खरेदी नोंदणीसाठी गरजेचे

शेतीशी संबंधित सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार

डिजिटल कृषी प्रणालीत सहभाग; शेतीसाठी आधुनिक सुविधा

नोंदणी कशी कराल?

तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर जाऊन नोंदणी करा!

सातबारा दस्तऐवज, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक करा!

ऑनलाइन प्रक्रियेमध्ये अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांचे सहकार्य घ्या!

शेतकरी बंधूंनो, ही सुवर्णसंधी गमावू नका! आजच आपले “अॅग्रीस्टॅक” ओळखपत्र तयार करून घ्या आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या !

तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवा ! शेअर करा!

##शेतकरी ##अॅग्रीस्टॅक ##DigitalFarming ##SmartAgriculture ##शेतीविकास ##FarmersFirst ##Agriculture ##PMKisan ##शेतीसमृद्धी

error: Content is protected !!
Exit mobile version