Home लाईफस्टाईल शैक्षणिक मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात उद्या 31 जुलै पर्यंत प्रवेश मिळेल

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात उद्या 31 जुलै पर्यंत प्रवेश मिळेल

0
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात उद्या 31 जुलै पर्यंत प्रवेश मिळेल
Hostel Admission Nandurbar

(नंदुरबार) : गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात (धर्मराज नगर कोरीट रोड, नंदुरबार) चालू शैक्षणिक वर्षासाठी 11वी, 12वी मध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय मुलांना 31 जुलै 2023 पर्यंत ऑफलाईन प्रवेश अर्ज सादर करता येतील, असे एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

अनु. जमाती, एन. टी., एस.बी.सी.,ओ.बी.सी., अनाथ, अपंग, यांच्यासाठी 20 टक्के प्रवेश

या वसतीगृहात अनु. जाती 80 टक्के व अनु. जमाती, एन. टी., एस.बी.सी.,ओ.बी.सी., अनाथ, अपंग, यांच्यासाठी 20 टक्के याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश अर्ज वसतीगृहाच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत, असेही गृहपाल यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here