Home तळोदा तळोदा तालुक्यातील मोरवड येथे ग्रामसभा संपन्न

तळोदा तालुक्यातील मोरवड येथे ग्रामसभा संपन्न

Gramsabha Morwad Taloda

(तळोदा ) तळोदा तालुक्यातील मोरवड उर्फरंजनपुर येथे ग्रामस्थांची ग्रामसभा जिल्हा परिषद शाळा मोरवड येथे सर्व अजेंड्यावरील विषयांच्या विचार विनिमय करून खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. (Gramsabha organized at Morwad in Taloda taluka)

ग्रामसभा : ग्रामसेवक नसीर शेख यांनी ग्रामस्थांना दिली विविध विकास कामांची माहिती

सुरुवातीला ग्रामसेवक नसीर शेख यांनी अजंड्यावरील शबरी आवास योजना, पंतप्रधान घरकुल योजना, मेरी मिट्टी मेरा देश तसेच माझी वसुंधरा कृषी खात्याच्या योजना शासनाकडून आलेले विविध परिपत्रके तसेच गावात वृक्ष लागवड करणे, त्याचप्रमाणे गावातील विविध झालेली विकास कामे, होणारी कामे तसेच शासनाच्या 15 वित्त आयोगातून आलेला पैसा, शासनाच्या पाच टक्के पेशा कायदा अंतर्गत आलेला पैसा, त्यात झालेली विविध विकास कामे याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली.

ग्रामसभा : सरपंच अक्षता वळवी यांचा व्यसनमुक्तीचा संदेश

अध्यक्ष भाषणात सरपंच अक्षता वळवी यांनी आपले गाव हे संत गुलाब महाराज संत रामदास महाराज त्याचप्रमाणे संत दग्गुमाता यांनी घालून दिलेल्या आदर्शावर गाव चालते. त्यांनी दिलेला व्यसनमुक्तीच्या संदेश पण ग्रामस्थ तंतोतंत पाळतो. म्हणून गावात कुठेही दारू विकली जात नाही. त्याच प्रमाणे त्यांनी केलेली स्वातंत्र्याची चळवळ तसेच शासन ज्या विविध योजनेतून घरकुल योजना देते त्यात पंतप्रधान घरकुल योजना, शबरीमाता योजना अशा विविध घरकुल योजनेतून शासनाचा योजनेच्या आपण सर्वजण लाभ घेतो आहे. त्यामुळे आपल्या संतांनी घालून दिलेल्या या योजनेत सुद्धा आपल्या घरासमोर कमीत कमी सात झाडे लावावीत या योजनेतून मिळालेले घरकुल त्यात शौचालय बांधावेच आणि त्या शौचालयाच्या उपयोग घ्यावा असे आव्हान त्यांनी ग्रामस्थांना केले.

gramsabha taloda

ग्रामसभा : मोरवड गावात सर्व ग्रामपंचायती व सहकारी संस्था निवडणुका बिनविरोध

संत गुलाब महाराज संत रामदास महाराज यांनी गाव शांत राहण्याकरता आज पर्यंत ग्रामपंचायती व सहकारी संस्था या निवडणुका नेहमीच बिनविरोध होतात.हाच खरा संतांनी दिलेला शिकवणुकीच्या आदर्श म्हणावा लागेल. तसेच गावातील प्रत्येकाने आपली घरपट्टी, पाणीपट्टी नियमित भरावी व गाव विकासाला चालना द्यावी असेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत उपसरपंच तसेच सदस्य ज्योती चौधरी, रणजीत चौधरी, प्रवीण वळवी, सुभाष पाटील, विकास पाडवी, तसेच शिक्षक विविध खात्याचे अधिकारी त्याचप्रमाणे तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते,आभार ग्रामसेवक नसीर शेख यांनी मांडले.

error: Content is protected !!
Exit mobile version