Home नंदुरबार जिल्हा 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit
Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit

(नंदुरबार) स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन मंगळवार 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9-05 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे प्रांगण नंदुरबार येथे साजरा करण्यात येणार असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. (Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit Hoisting of Government Flag on 15 August)

मुख्य शासकीय ध्वजारोहण : नागरिकांनी उपस्थित रहावे

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, शौर्य पुरस्कार विजेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, इतर मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version