Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘वॉर रूम’ पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘वॉर रूम’ पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन

0
जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘वॉर रूम’ पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
Guardian Minister Sanjay Rathod inaugurated the 'War Room' in the District Collector's Office

यवतमाळ : जिल्ह्यात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय गतिमानता आणि सुशासनाच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या जिल्हा ‘वॉर रुम’ चे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते आणि आदिवासी विकासमंत्री ना.डॉ. अशोक ऊईके यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या जिल्हा ‘वॉर रुम’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विभागांचे कामकाज, प्रकल्पाची प्रगतीची देखरेख अर्थात मॅानिटरिंग केली जाणार आहे. तसेच सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तथ्यांवर आधारित निर्णय घेवून प्रशासन अधिक पारदर्शक व प्रभावी बनविणे, योजनांच्या अंमलबजावणीत एकसूत्रता आणणे, नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी ही वॅार रुम कार्यरत राहणार आहे. यासह आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण,आरोग्य, महसूल, कृषी या विभांगासह सुमारे ३० विभागांच्या योजनांचे मॅानिटरिंग केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाचे एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.      पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून या ‘वॉर रुम’ची निर्मिती करण्यात आली असून त्याचे संपूर्ण कामकाज अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॅार्मवर आधारित असणार आहे.

त्यामध्ये उभारी पोर्टल, महा ई सेवा, डॅशबोर्ड, मोबाईल ॲप्स, हेल्पलाईन आदींचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here