
(अक्कलकुवा) अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियमांतर्गत वनहक्क दाव्यांच्या प्रभावी व पारदर्शक निपटाऱ्यासाठी अक्कलकुवा तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी आयोजित करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सुनावणीत एकूण 369 वनहक्क दाव्यांवर सविस्तर सुनावणी घेण्यात आली. प्रत्येक प्रकरणाची वस्तुनिष्ठ पडताळणी करून संबंधित दावेदारांचे म्हणणे ऐकून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी मा. संतोष सस्ते, उपवनसंरक्षक, नंदुरबार, मा. सुहास चव्हाण, उपवनसंरक्षक, तळोदा, श्री. देवेंद्र पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, नंदुरबार, अशासकीय सदस्य मा. कांतीलाल पाडवी, जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, तालुका व्यवस्थापक दीपक पाडवी, सहाय्यक माकत्या वसावे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने दावेदार उपस्थित होते.
वनहक्क दाव्यांची प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
#Nandurbar#ForestRightsAct#VanHakk#Akkalkuwa#DrMittaliSethi#DistrictAdministration#GoodGovernance#TribalDevelopment#Maharashtra#Jansampark#NandurbarUpdates