
जिल्ह्यातील कुपोषण समस्येवर लक्ष केंद्रित करून मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कंजाला व भगदरी येथील डोंगरफली पाड्याला भेट दिली.
येथे बालक (वय – 8 महिने 24 दिवस, जन्म – 18 डिसेंबर 2024) हा बालक SAM (गंभीर कुपोषित) श्रेणीत असल्याचे निदर्शनास आले. त्याचे वजन आज 4.850 किलो असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ एनआरसी, मोलगी येथे दाखल करण्याचे निर्देश दिले.
येथील दोन बालकांची पाहणी करण्यात आली –
सदर प्रकरणी मा. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम सरपंचांना सूचना दिल्या की, संबंधित पालकांना महिला बचत गटामार्फत दूध व इतर पौष्टिक आहार पुरवावा, ज्यामुळे बालकांचे आरोग्य सुधारेल.
या दौऱ्यातील पाहणीमुळे कुपोषित बालकांना तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाले. तसेच ग्रामपातळीवर बचत गट आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पौष्टिक आहार उपलब्ध करण्याच्या सूचना देऊन मा. जिल्हाधिकाऱ्यांनी कुपोषणमुक्त जिल्हा या उद्दिष्टाकडे ठोस पाऊल टाकले.
#Nandurbar#DistrictCollector#DrMitaliSethi#ChildHealth#MalnutritionFree#NutritionMatters#HealthForAll#SAMChildren#PHCVisit#CommunitySupport#PublicHealth#PoshanAbhiyan#ChildCare#HealthyFuture#NutritionAwareness#SaveChildren#RuralHealth#NandurbarUpdates