
नंदुरबारहुन शहादाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक दिल्याची घटना घडलीय. शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून, यात टॅक्सीचा अक्षरशः चकणाचूर झाला आहे. नंदुरबारहुन शहादाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक दिल्याची घटना घडलीय.शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून, यात टॅक्सीचा अक्षरशः चकणाचूर झाला आहे.या भीषण अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.ट्रक आणि टॅक्सीची धडक इतकी भीषण होती की टॅक्सीचे मोठे नुकसान झाले आहे.तर अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र यातील वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे.