
सेतू केंद्र व महसूल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले.
विद्यार्थी व नागरिकांना शैक्षणिक व इतर दाखले विनासायास सहज मिळावे, यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र आणि महसुल यंत्रणा अधिक सक्षम करण्यात यावी. अनुचित बाबी रोखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या दाखले वितरण प्रक्रियेची कसून तपासणी करावी – मंत्री बावनकुळे
बैठकीस आमदार महेश बालदी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. तर, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.