Home नंदुरबार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्वाची संधी

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्वाची संधी

Important opportunity for farmers under Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme

(नंदुरबार) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 04 एकर जिरायती किंवा 02 एकर बागायती जमीन 100% अनुदानावर देण्याची योजना शासनाने अमलात आणली आहे.

या योजनेअंतर्गत जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी शासकीय रेडीरेकनर दराने आपली जमीन विक्रीसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, श्री. सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

जमीन विक्रीसाठी अटी व शर्ती (थोडक्यात):

स्वतःच्या मालकीची किमान ४ एकर जिरायती / २ एकर बागायती जमीन असावी

जमीन बोजारहित व वादमुक्त असावी

सर्व मालकांची संमती व स्वाक्षरी आवश्यक

बागायती जमिनीसाठी पाणी व रस्त्याची माहिती आवश्यक

जमीन मोजणी करूनच खरेदीचा निर्णय होईल

अर्ज केला म्हणजे जमीन विकावीच लागेल असे नाही

शासनावर खरेदीचा बंधनकारक निर्णय लागू नाही

अर्ज करण्याचे ठिकाण:

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार

#NandurbarUpdates#SamajKalyanVibhag#SablikaranYojana#KarmaveerGaikwadYojana#LandGrantScheme#SCWelfare#SocialJustice#भूमिहीनसाठीशासन

error: Content is protected !!
Exit mobile version