
आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी होत आहे.जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास टोल फ्री कॉल सेंटर उपलब्ध असून, १५५३८८ / १८०००२३३२२०० व १४५५५ / १८००१११५६५ या क्रमांकांवर माहिती व तक्रारी नोंदवता येणार आहेत. योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे, इम्प्लांट्स, जेवण व एक वेळचे प्रवास भाडे पूर्णपणे मोफत व कॅशलेस देणे रुग्णालयांना बंधनकारक असून, उपचार नाकारल्यास किंवा रक्कम मागितल्यास संबंधित रुग्णालयावर दंड, निलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.