Home नंदुरबार जिल्हा परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ईव्ही धोरण...

परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ईव्ही धोरण घोषित करण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी.

In order to keep the state safe and beautiful in the transportation sector, a new EV policy should be announced in the next 3 years, and vehicles that are 15 years old should be scrapped.

रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version