Home नंदुरबार जिल्हा महसूल विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे स्पष्ट निर्देश —...

महसूल विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे स्पष्ट निर्देश — “कार्यक्षम, पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासन हेच आपले ध्येय”

In the review meeting of the Revenue Department, District Collector Dr. Mittali Sethi gave clear instructions — “Efficient, transparent and citizen-oriented administration is our goal”

(नंदुरबार) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची सर्वसमावेशक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महसूल प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होऊन, जिल्ह्यातील महसूल कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक व परिणामकारक करण्याबाबत ठोस सूचना देण्यात आल्या.

बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला —

घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देणे : वाळू गटांचे सर्वेक्षण करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी.

गावठाण जाहीर करण्याची प्रक्रिया गतीमान करावी : ‘ई-चावडी’ अंतर्गत प्रलंबित प्रस्तावांची पूर्तता लवकरात लवकर करावी.

खरीप हंगाम पिक पाहणी १०० टक्के पूर्ण करावी : शेतकऱ्यांच्या हक्काचे हित लक्षात घेऊन सर्व तालुक्यातील पिक पाहण्या वेळेत पूर्ण करण्यात याव्यात.

प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत कराव्यात : नागरिकांना सेवा वेळेत मिळावी यासाठी प्रलंबित फेरफार नोंदी तातडीने निर्गत करण्याचे आदेश.

जनसंवाद अभियान प्रभावीपणे राबवावे : नागरिकांच्या तक्रारी व मागण्या तत्काळ निवारण करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयाने जनसंवाद अभियान नियमितपणे राबवावे.

शासकीय वसुलीबाबत कडक पावले उचलावीत : तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी संबंधितांच्या बैठका घेऊन १००% वसुली निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश.

शासकीय बांधकामांच्या तपासणीसाठी देखरेख मजबूत करावी : नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावरील सुरू असलेल्या बांधकामांबाबत संबंधित J.E. शी समन्वय साधून कामांची गुणवत्ता सुनिश्चित करावी.

बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्टपणे सांगितले की —

“महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. नागरिकांना वेळेवर आणि पारदर्शक सेवा देणे ही आपली जबाबदारी असून, कार्यात कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही.”

या बैठकीत जिल्हा प्रशासनातील सर्व महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Nandurbar#CollectorOffice#DrMitaliSethi#RevenueDepartment#GoodGovernance#जनसंवादअभियान#EChavdi#PublicService#NandurbarDistrict#Maharashtra#महसूलआढावबैठक#DistrictAdministration

error: Content is protected !!
Exit mobile version