भारतीय नौदलात आघाडीवर कार्यरत असलेली आयएनएस सहयाद्री आणि आयएनएस कोलकाता ही हिंदी महासागरी प्रदेशाच्या आग्नेय क्षेत्र मोहिमेसाठी नेमणूक झालेली जहाजे काल, 17 जुलै 2023 रोजी जकार्ता येथे दाखल झाली. इंडोनेशियाच्या नौदलाने या जहाजांचे स्नेहार्द वातावरणात स्वागत केले.
दोन्ही देशांदरम्यान परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जाकार्तामधील बंदर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तपशीलवार व्यावसायिक परस्पर संवाद, संयुक्त योग सत्रे, क्रीडाविषयक कार्यक्रम तसेच परस्परांच्या जहाजांना भेटी इत्यादी कार्यक्रमांमध्ये भारतीय आणि इंडोनेशीय नौदलांतील कर्मचारी सहभागी होतील.
परिचालनविषयक सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर, दोन्ही भारतीय जहाजे इंडोनेशियाच्या नौदलासह सागरी भागीदारी सराव (एमपीएक्स) कार्यक्रमात सहभागी होतील. दोन्ही देशामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आंतर-परिचालन विषयक कार्यक्रमांमध्ये अधिक भर घालण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आयएनएस सहयाद्री हे स्वदेशी पद्धतीने विकसित आणि प्रकल्प-17 वर्गातील तिसरे लढाऊ जहाज आहे तर, आयएनएस कोलकाता हे देखील स्वदेशी पद्धतीने विकसित आणि प्रकल्प-15 ए वर्गातील पहिले विनाशक जहाज आहे. मुंबई येथील माझगाव गोदी जहाजबांधणी कंपनीमध्ये या दोन्ही जहाजांची उभारणी करण्यात आली आहे.
![](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/INS-Kolkata-INS-Sahyadri-2-1024x576.png)