आत्मा (ATMA) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १ ते ३ डिसेंबर २०२५ तसेच १० ते १२ डिसेंबर २०२५ या दोन टप्प्यांमध्ये हे प्रशिक्षण NIPHM (National Institute of Plant Health Management), हैदराबाद येथे पार पडले.
या प्रशिक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ७८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना BRC – On Farm Bio Input Production Centre विषयी सखोल माहिती देणे व जैविक शेतीला चालना देणे हा होता.
प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना शेतातच जैविक निविष्ठा निर्मिती, जैवखते, जैवकीटकनाशके, कंपोस्ट व सूक्ष्मजीव आधारित उपाययोजना याबाबत सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ प्रशिक्षकांनी जैविक शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, खर्च कमी करण्याच्या पद्धती तसेच शाश्वत शेती व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.
या आंतरराज्य प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांमध्ये जैविक शेतीविषयी जागरूकता वाढली असून स्वतःच्या शेतात BRC स्थापन करून उत्पादन खर्च कमी करण्यास व पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्यास प्रेरणा मिळाली आहे.
आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे असे प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांचे उत्पन्न वाढविण्यास उपयुक्त ठरत असून नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत व सेंद्रिय शेतीला चालना मिळत आहे.
(Collector Office Nandurbar)
#ATMA#NIPHM#brctraining#farmertraining#SustainableAgriculture
