Home नंदुरबार जिल्हा सभागृहात सदस्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत होणे...

सभागृहात सदस्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत होणे आवश्यक आहे.

Issues raised by members in the House through various parliamentary instruments must be resolved within the prescribed time limit.

अतारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, लक्षवेधी सूचनांची निवेदने, विशेष उल्लेख सूचना, मंत्री महोदयांची आश्वासने, महाराष्ट्र विधानपरिषद नियम ९३ अन्वये सूचना याबाबत प्रलंबितता असल्यास ती तातडीने दूर करण्यात यावी. त्याचप्रमाणे एकाच विषयाची विविध संसदीय आयुधांद्वारे विधानपरिषद सभागृह कामकाजात पुनरावृत्ती होऊ नये, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बैठकीत दिले.

अधिवेशन कालावधीतील प्रवेशपत्र वितरण प्रक्रिया आणखी कडक करण्यात यावी तसेच सुरक्षा यंत्रणेतील ३३ टक्के कर्मचारी वर्ग दर अधिवेशनाला चक्रक्रमानुसार पोलीस महासंचालकांशी समन्वय साधून बदलण्यात यावा, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

यासंदर्भात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिवांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात येऊन आढावा घेण्यात आला.या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, सचिव (2) मेघना तळेकर-इटकेलवार, सचिव (3) डॉ. विलास आठवले, सचिव (4) शिवदर्शन साठ्ये आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version