Home महाराष्ट्र वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या पल्स या वैद्यकीय...

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर

Jio World Center in Mumbai is organizing the Pulse Medical Conference, which will make Maharashtra known globally in the field of medicine.

परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

‘पल्स’ वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून वेलनेस उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी ‘वेलनेस’ उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ‘वेलनेस’ उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुष मधील उपचार पद्धतींना ‘वेलनेस’ कडे वळविण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अशी असणार ‘पल्स’ परिषद :

परिषदेचे उद्घाटन २७ मार्च २०२७ रोजी होईल.

परिषदेत प्लेनरी, ३६० डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत.

उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती असणारी दालने असणार आहेत.

परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील.

जगातील नामांकित वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभाग घेणार आहेत.

भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतीतील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार आहेत.

तसेच प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा, ‘टेक टॉक’ असणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version