Home शेती खरीप हंगाम पीक स्पर्धा 2025 – उत्पादनवाढीच्या दिशेने शेतकऱ्यांचे यशस्वी पाऊल!

खरीप हंगाम पीक स्पर्धा 2025 – उत्पादनवाढीच्या दिशेने शेतकऱ्यांचे यशस्वी पाऊल!

Kharif Season Crop Competition 2025 – Farmers' successful step towards increasing production!

(नंदुरबार) कृषी विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे खरीप हंगाम 2025 करिता राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यास प्रेरणा देण्यासाठी व आधुनिक शेतीत प्राविण्य मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यासाठी ही स्पर्धा राज्यभर राबवली जात आहे.

स्पर्धेतील समाविष्ट पिके –

खरीप पिके (11):

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल

रब्बी पिके (5):

ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस

अर्ज करण्याची अंतिम तारीख

⦁ मूग, उडीद – 31 जुलै 2025

⦁ इतर खरीप पिके – 31 ऑगस्ट 2025

⦁ रब्बी पिके – 31 डिसेंबर 2025

प्रवेश शुल्क –

सर्वसाधारण गट: ₹300 प्रति पीक

अनुसूचित जमाती (आदिवासी): ₹150 प्रति पीक

आवश्यक जमीन क्षेत्र –

भात पिकासाठी: किमान 20 गुंठे सलग लागवड

इतर पिकांसाठी: किमान 40 गुंठे सलग लागवड

टीप: शेतकरी स्वतःच्या नावावरील जमिनीवर पीक घेतलेले असावे व ती तो स्वतः कसत असावा.

अर्ज प्रक्रिया:

⦁ शेतकऱ्यांनी विहित प्रपत्र-अ मध्ये अर्ज भरून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

⦁ प्रवेश शुल्काची पावती

⦁ 7/12 आणि 8-अ उतारा

⦁ जात प्रमाणपत्र (फक्त अनुसूचित जमातीसाठी)

⦁ चिन्हांकित क्षेत्राचा नकाशा

⦁ बँक पासबुक / चेकबुक (छायांकित प्रत)

अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्या.

बक्षिसांचे स्वरूप –

तालुका पातळी:

₹5,000 ₹3,000 ₹2,000

जिल्हा पातळी:

₹10,000 ₹7,000 ₹5,000

राज्य पातळी:

₹50,000 ₹40,000 ₹30,000

स्पर्धेचे उद्दिष्ट:

या स्पर्धेद्वारे गुणवत्तापूर्ण आणि उच्च उत्पादनक्षम शेतीस प्रोत्साहन देऊन, शेतकऱ्यांना प्रेरणास्थान बनवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक सहभागी शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची दखल घेऊन सन्मानित करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.

“तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत शेती, वाढत्या उत्पादनाची हमी”

कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे आणि राज्यस्तरीय गौरव मिळवावा!

#खरीपस्पर्धा20251#महाराष्ट्रकृषी#शेतकरीसन्मान#पीकउत्पादन#nandurbarkrushi#FarmersFirst#cropcompetition#AgriInnovation#shetkariprerna#PMFBY

error: Content is protected !!
Exit mobile version