
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक व वेळेवर कर्ज मिळावे यासाठी नंदुरबार जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) शिबिरांना आजपासून सुरुवात झाली आहे. ७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ दरम्यान निवडक ग्रामपंचायतींमध्ये दररोज शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
या उपक्रमात किसान क्रेडिट कार्डचे मंजुरीकरण आणि नूतनीकरण हे जिल्हा प्रशासन व बँकांसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.
आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणारी शिबिरे:
किसान क्रेडिट कार्ड (KCC) म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी, नंतरच्या प्रक्रिया, विपणन, उपजीविकेच्या गरजा व गुंतवणुकीसाठी योग्य आणि वेळेवर कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.
1. पीक लागवडीसाठी अल्पमुदतीचे कर्ज
2. कापणी नंतरचे खर्च
3. उत्पादन विक्रीसाठी विपणन कर्ज
4. शेतकरी कुटुंबासाठी उपभोग गरजा
5. शेतीपूरक उपक्रमासाठी भांडवली खर्च
6. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कर्ज
व्यवहारासाठी माध्यम:
शेतकरी त्यांच्या किसान क्रेडिट कार्डचा वापर खालील माध्यमांद्वारे करू शकतात:
⦁ ATM किंवा मायक्रो ATM मधून पैसे काढता येतील.
⦁ बँकेचे प्रतिनिधी (BC) किंवा विक्रेत्यांकडील मशीनद्वारे व्यवहार करता येतील.
⦁ मोबाईल बँकिंग आणि IVR कॉलच्या माध्यमातून पैसे तपासता किंवा व्यवहार करता येतील.
⦁ आधार कार्डाशी जोडलेले कार्ड असल्यास, बायोमेट्रिकद्वारे व्यवहार शक्य आहे.
पात्रता (Eligibility):
या योजनेचा लाभ खालील प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळू शकतो:
⦁ स्वतःची शेती करणारे वैयक्तिक किंवा संयुक्त शेतकरी.
⦁ तोंडी भाडे कराराने किंवा वाटेकरी पद्धतीने शेती करणारे शेतकरी.
⦁ शेतकऱ्यांचे गट (SHG किंवा JLG) ज्यामध्ये भाडेकरू व वाटेकरी देखील असू शकतात.
आवश्यक कागदपत्रे:
1. २ पासपोर्ट साईज फोटो
2. ओळखपत्र (आधार, PAN, DL, Voter ID)
3. पत्त्याचा पुरावा
4. महसूल विभागाचा जमीनधारणाचा पुरावा
सूचना:
या शिबिरांमध्ये किसान क्रेडिट कार्डचे मंजुरी/नूतनीकरण प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतील. शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
#किसान_क्रेडिट_कार्ड#KCC2025#शेतकरी_हित#नंदुरबार_जिल्हा#कृषीविकास#कर्ज_सहाय्य#AgriSupport#districtnandurbar#BankingForFarmers#FinancialInclusion