Home नंदुरबार जिल्हा शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

(नंदुरबार) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे शैक्षिणिक 2023-2024 वर्षांसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनीसाठी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल सुषमा मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वसतीगृहात नंदुरबार शहरातील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीना प्रवेश देण्यात येतो. शासकीय वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून प्रवेशित मुलींना मोफत निवास, भोजन, नाश्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल खर्च, तसेच दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल.

सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्यांनी सुद्धा वसतिगृह प्रवेशासंदर्भातील माहिती आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित अनुसूचित जाती तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून द्यावी. शालेय विभागासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जुलै,2023 तर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयासाठी 31 जुलै,2023 अशी आहे.

प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे मोफत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (9527505895 / 9881903313) वर संपर्क साधावा.असे आवाहन गृहपाल श्रीमती मोरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version