Home प्रॉपर्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्या प्रमुख उपस्थितीत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मेघालय सदन’ चा जमीन हस्तांतरण व भूमिपूजन

1
Land transfer and groundbreaking ceremony for 'Meghalaya Sadan' in the distinguished presence of Chief Minister Devendra Fadnavis and Meghalaya Chief Minister Conrad K. Sangma.

ईशान्येतील मेघालय ही केवळ दोन राज्ये नसून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्ये आहेत, यानिमित्ताने दोन्ही राज्यातील सांस्कृतिक व आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी ‘मेघालय भवन’साठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

यावेळी मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग, मेघालयचे सामान्य प्रशासन विभाग मंत्री सोस्थेनिस सोहतुन, खासदार मिलिंद देवरा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, मेघालयचे मुख्य सचिव शकील अहमद, मेघालयच्या सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त व सचिव सिरिल व्ही. डी. डिएंगडोह, पनवेलचे महापौर नितीन पाटील, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सिडकोचे मुख्य महाव्यवस्थापक अश्विन मुद्गल, सिडकोचे सहव्यवस्थापक राजा दयानिधी, सिडकोचे सहव्यवस्थापक गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, पनवेल प्रांताधिकारी पवन चांडक, तहसिलदार मिनल भामरे तसेच महाराष्ट्रात वास्तव्यास असणारे मेघालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.