Home आरोग्य विधानसभा प्रश्नोत्तरे

विधानसभा प्रश्नोत्तरे

2
Legislative Assembly Question Hour

मुंबई: रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांसोबत सौहार्दपूर्ण वर्तन करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना निर्देशित करण्यात आले असून सर जे. जे. रुग्णालयातील समाजसेवा विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विलास भुमरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ बोलत होते.

मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले, सर जे. जे. रुग्णालयातील समाजसेवा विभागातील अधीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत संस्थेकडे तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने संस्थास्तरावर चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल विचारात घेऊन अधिष्ठाता, सर जे. जे. रुग्णालय यांनी समाजसेवा अधीक्षक संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार आहे, अशा कर्मचाऱ्यांना यापुढे कर्तव्यात कसुर होणार नाही, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

तसेच जे कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आहेत, अशा कर्मचाऱ्यांची रजा विनावेतन करण्यात आलेली आहे. दोषी आढळून आलेल्या समाजसेवा अधिक्षकांपैकी २ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या २६ जून २०२६ रोजीच्या आदेशान्वये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. सचिव, आयुक्त यांना यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर, तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.