Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून गुजरात मध्ये जाणारी दारू व गुटखा रेल्वे सुरक्षा बलाच्या...

नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून गुजरात मध्ये जाणारी दारू व गुटखा रेल्वे सुरक्षा बलाच्या सहकार्याशिवाय जाऊ शकत नाही

1
Liquor and gutkha cannot be transported from Nandurbar railway station into Gujarat without the cooperation of the Railway Protection Force.

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून गुजरात मध्ये जाणारी दारू व गुटखा रेल्वे सुरक्षा बलाच्या सहकार्याशिवाय जाऊ शकत नाही अशी स्थिती असताना रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी नंदुरबारमध्ये कार्यरत आरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतात कार्य करीत आहे किंवा कसे? अशी शंका यावी इथपर्यंत हे गंभीर प्रकरण वळण घेत आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या एक दोन महिन्यापासून गुटखा व इतर तत्सम बाबींवर धडाकेबाज कारवाई सुरू केलेली असतानाच रस्ते मार्गाने खाजगी कारमध्ये किंवा ट्रकमध्ये येणारा गुटखा आता सरळ रेल्वेच्या सुरक्षित मार्गाद्वारे येऊ लागला आहे. रेल्वेचा हा मार्ग गुटखा माफियांसाठी सुरक्षित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी अमित यादव यांनी मोठी जबाबदारी केली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. अमित यादव या परराज्यातील अधिकाऱ्याला नंदुरबार रेल्वे स्टेशनवर चालू असलेला आणि प्रवाशांना त्रास देणाऱ्या फेरीवाल्यांचे हफ्ते घेऊन आपल्या पदाची गरिमा आणि जबाबदारी डावलून रेल्वे अधिनियमाच्या विरोधात काम करण्याची जणू काय सवयच लागली आहे, असेच एकूण चित्र आहे. गतकाळात प्रवासी बॅग मधून लाखो रुपयाची दारू गुजरातमध्ये जात असतानाची कारवाई झाली, ही ही कारवाई मागे घ्यावी म्हणून बेकायदेशीर दारू माफियांनी अमित यादव मार्फत वरिष्ठांकडे देखील संपर्क साधला असल्याचे कळते, या काळात अमित यादव या पोलीस सब इंस्पेक्टर ने कोणा कोणाशी संपर्क साधला? याचे मोबाईल लोकेशन व डिटेल काढले तर ते स्पष्ट होईल. आरपीएफ कार्यालयात सर्रास दोन नंबरचे धंदे, धंदेवायकांचे येणे जाणे, रात्री उशिराच्या फास्ट ट्रेन व पहाटेच्या फास्ट ट्रेन यातून हा सर्व प्रकार सब इन्स्पेक्टर अमित यादव आणि त्याचे काही बगलबच्चे त्यांनी अक्षरशा धुमाकूळ घातल्याचे चित्र नंदुरबार रेल्वे स्थानकावर व परिसरात पहावयास मिळत आहे. या गंभीर प्रकारावर विना विलंब कार्यवाही व्हावी, प्रवासी रेल्वे बरोबरच मालवाहतूक गाड्यांमधील चोरी आता बाहेर येऊ लागलेली आहे. या बाबींवर अधिकृत नोंदी होत नसल्या तरी मालवाहतूक गाड्यांवरील चोरी हि बाब आता चर्चेची झाली आहे. राज्याच्या पोलीस विभागाकडून आलेले जी.आर. पी. यांना सतत दबावाखाली ठेवून आरपीएफचा पोलीस सब इन्स्पेक्टर अमित यादव आणि त्याचे बगलबच्चे अक्षरशः दहशत माजवीत आहेत.
या संपूर्ण गंभीर प्रकाराकडे आरपीएफ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनावलंब कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या गंभीर प्रकाराविरुद्ध आर. पी.एफ. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नंदुरबार परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक व विविध राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी एका शिष्टमंडळाद्वारे जाणार आहेत.