Home महाराष्ट्र साहित्यप्रेमी, पुस्तक विक्रेते व प्रकाशकांनी सहभाग घ्यावा

साहित्यप्रेमी, पुस्तक विक्रेते व प्रकाशकांनी सहभाग घ्यावा

Literature lovers, booksellers and publishers should participate.

(नंदुरबार) राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयाच्या आधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नंदुरबार आणि नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 27 व 28 फेब्रुवारी 2026 रोजी कन्यादान मंगल, नंदुरबार येथे “नंदुरबार ग्रंथोत्सव 2025” चे आयोजन करण्यात आले आहे, साहित्यप्रेमी, पुस्तक विक्रेते व प्रकाशकांनी या ग्रंथोत्सवात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ग्रंथ विक्री व प्रकाशकांसाठी सुवर्णसंधी

या ग्रंथोत्सवात नामवंत प्रकाशन संस्थांचे ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला, नंदुरबार येथे किंवा 9833467604 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल

ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने केवळ पुस्तक विक्रीच नव्हे, तर विविध वैचारिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे:

• कवी संमेलन: जिल्ह्यातील स्थानिक कवींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘हास्यकवी’ व ‘बहुभाषिक कवी’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्थानिक साहित्यिकांनी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाशी संपर्क साधावा.

• कथाकथन स्पर्धा: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘समाज सुधारकांच्या आयुष्यातील प्रसंग’ या विषयावर कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे जिल्हा ग्रंथालय कार्यालयात नोंदवावीत.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रंथ आणि साहित्य प्रेमी रसिकांनी 27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजित या ग्रंथोत्सवाचा विनामूल्य लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा ग्रंथालय समन्वय समिती आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. वळवी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version