Home शैक्षणिक लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

2
Lokmanya Trophy Lanja Taluka-level Elocution Competition Concludes Enthusiastically

लांजा(प्रतिनिधी):-सन 1982 मध्ये स्थापन झालेल्या नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित व रिद्धेश कन्स्ट्रक्शन, मुंबई पुरस्कृत वतीने आयोजित लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा  1 ऑगस्ट 2026 रोजी नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर आधारित विषयांवर ही स्पर्धा प्राथमिक व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी ते 8 वी), माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता 9 वी ते 12 वी) आणि खुला गट अशा तीन गटांत घेण्यात आली. स्पर्धेला तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 13 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी 33 स्पर्धक मुली होत्या. प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातील प्रथम क्रमांक संस्कृती विजय मोहिते (जि.प.पू.प्रा.आदर्श शाळा, व्हेळ नं.1) हिला 1000 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ओम उदय यादव (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, शिरवली) यास 700 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक आराध्या सचिन भिंगारे (ज.गं.पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे) हिला 500 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ ज्ञानेश्वरी प्रसन्न शिंदे (ज.गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे) व आरुष योगेश खाके (जि.प.पू. प्राथमिक शाळा, पालू नं.1) यांस प्रत्येकी प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक आश्विनी धोंडीराम झोरे (बॅ.नाथ पै.विद्यालय, हर्चे) हिला 1500 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक समृद्धी दिगंबर साळसकर (श्रीराम विद्यालय, वेरवली बु.) हिला 1000 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांक साक्षी राजेश मोहिते (प्रतापराव माने विद्यालय व सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेड) 700 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ पूर्वी सत्यवान राणे (श्रीराम विद्यालय, वेरवली बु.), कौसर असलम वारुणकर (प्रतापराव माने विद्यालय व सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेड) आणि लावण्या योगेश नागवेकर (आदर्श विद्यामंदिर, प्रभानवल्ली) यांस प्रत्येकी प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. खुल्या गटात प्रथम क्रमांक श्रृतिक सुशांत प्रभुलकर (प्रभानवल्ली) 2000 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक अथर्व विवेक पाध्ये (लांजा) 1500 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांक अथर्व संदेश तेंडूलकर (भडे) 1000 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ नेहा विशाल कांबळे (कोर्ले) रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. राहूल मराठे व डॉ. बी. टी. शिंदे यांनी काम पाहिले. आर्यन बेर्डे यांनी वेळपाल (Time Keeper) म्हणून, तर ऋग्वेद चिले यांनी व्हिडिओ चित्रीकरणाची जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे सूत्रसंचालन मंडळाचे चिटणीस ऋषिकेश बेर्डे व चिन्मय भिंगार्डे यांनी केले.
कार्यक्रमास नवयुग उत्कर्ष युवक मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र लाड, भांबेड ग्रामपंचायतीचे प्रशासक भार्गव दैत, प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा त्रिभुवने, प्रतापराव माने विद्यालय व सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेडचे मुख्याध्यापक इलाही मुलाणी, भांबेड केंद्रप्रमुख शरद मदने, मंडळाचे चिटणीस ऋषिकेश बेर्डे, सहचिटणीस सौरभ कानडे, खजिनदार गुरुप्रसाद मासये, कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण हेगिष्टे, प्रमिला गांगण, सोनिया गांधी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. जयराज मांडवकर, युवाक्रांती पतपेढीचे चेअरमन दिगंबर भिंगार्डे, सामाजिक कार्यकर्ते सहदेव जाधव, संदेश गुरव, तेजस बाईंग तसेच तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.