Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजकांसाठी ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026’ कार्यशाळेचे आयोजन

नंदुरबार जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजकांसाठी ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026’ कार्यशाळेचे आयोजन

'Maha Narayit Ignite Convention 2026' workshop organized for export-oriented entrepreneurs of Nandurbar district

नंदुरबार जिल्ह्यातील एमएसएमई तसेच निर्यातक्षम उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील नव्या संधी, शासनाच्या विविध योजना व उद्योगविकासाशी संबंधित मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत ही कार्यशाळा दि. 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षेततेखाली आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील एमएसएमई क्षेत्राला निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे, ‘एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ उपक्रमाची माहिती देणे तसेच उद्योगविकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या योजना, उपक्रम व सवलती यांची सविस्तर माहिती उद्योजकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. निर्यात प्रक्रियेतील संधी, आव्हाने, वित्तपुरवठा, गुणवत्ता मानके, बाजारपेठा व तांत्रिक सहाय्य याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन निर्यातक्षम उद्योगांच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठिकाण: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

दिनांक: 16 जानेवारी 2026

वेळ: सकाळी 9.00 वाजता

error: Content is protected !!
Exit mobile version