Home महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र दिन, राष्ट्रध्वजाला मानवंदना

लोकभवन येथे महाराष्ट्र दिन, राष्ट्रध्वजाला मानवंदना

Maharashtra Day at Lok Bhavan, salute to the national flag

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन, मुंबई येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.यावेळी राष्ट्रगान, राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.

यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस.राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ.निशिकांत देशपांडे, लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version