Home महाराष्ट्र भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025मधील महाराष्ट्र दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्घाटन

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025मधील महाराष्ट्र दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्घाटन

Maharashtra Pavilion at India International Trade Fair-2025 to be inaugurated on November 14

नवी दिल्ली: भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025चे 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025रोजी दुपारी 12वा. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदन सचिव तथा निवासी आयुक्त आर विमला, विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र कुशवाह, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ उपाध्यक्ष जयदीप कवाडे, व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित (MSSIDC) यांच्या वतीने हे दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र दालनात एकूण 60 गाळे उभारण्यात आले असून एक जिल्हा एक उत्पादन, महिला बचत गट, महिला उद्योजिका, यांना वाटप करण्यात आले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्राच्या समृद्ध कला-संस्कृतीचे दर्शन

महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ठीक 6.00वाजता प्रगती मैदानातील ॲम्फी थिएटर नं. 1 येथे होईल. दोन्ही कार्यक्रमांना मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, महाराष्ट्राच्या उद्योग-व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी हे दालन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पासेस महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी तेथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -243

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi

error: Content is protected !!
Exit mobile version