Home नंदुरबार हरित महाराष्ट्र आयोगाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

हरित महाराष्ट्र आयोगाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

1
Meeting of the District-Level Monitoring Committee of the Green Maharashtra Commission Concluded

(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज हरित महाराष्ट्र आयोगाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली.

बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या 300 कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वृक्षलागवड नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सन 2026 च्या पावसाळ्यात नंदुरबार जिल्ह्यात 15 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, त्यानुसार विविध विभागांना वृक्षलागवडीचे लक्ष वाटप करण्यात आले.

यावेळी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क क्षेत्रात बांबू लागवड तसेच पडीत जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून जिल्ह्याचे हरितीकरण अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षलागवड करून मोहिमेची उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

#हरितमहाराष्ट्र#300कोटीवृक्षारोपण#वृक्षलागवड#हरितनंदुरबार#डॉमित्तालीसेठी#महाराष्ट्रशासन#GreenMaharashtra#Nandurbar#Environment#TreePlantation