Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात मिनी बँक सुविधा – बँकिंग सेवा आता आपल्या शिधा दुकानात!

नंदुरबार जिल्ह्यात मिनी बँक सुविधा – बँकिंग सेवा आता आपल्या शिधा दुकानात!

mini bank suvida nandurbar

ग्रामीण भागात अनेकदा प्राथमिक बँकिंग सुविधा सहज उपलब्ध नसतात. नागरिकांना लांबच्या शहरात किंवा गावात जाऊन व्यवहार करावे लागतात, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. या समस्येवर उपाय म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या संकल्पनेतून, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक आणि Airtel Payment Bank यांच्या सहकार्याने “मिनी बँक” ही योजना सुरू करण्यात आली आहे.

विशेष वैशिष्ट्य:

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, नंदुरबार जिल्ह्यातील ७९ रास्तभाव दुकाने मिनी बँक स्वरूपात सुरू करण्यात आली – हा ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

जिल्ह्यातील मिनी बँकची सद्यस्थिती:

सध्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण ७९ रास्तभाव दुकाने मिनी बँक म्हणून कार्यरत आहेत.

तालुकानिहाय वितरण:

1. अक्कलकुवा – १२

2. अक्राणी – १४

3. नवापूर – ३३

4. तळोदा – १९

5. शहादा – १

योजनेची मुख्य उद्दिष्टे:

⦁ रास्तभाव दुकानदारांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध करून देणे.

⦁ गावातील नागरिकांना त्यांच्या गावातच डिजिटल व आर्थिक सेवा मिळवून देणे.

⦁ सरकारी योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवणे.

⦁ बँकिंग साक्षरता वाढवणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे.

मिनी बँकद्वारे मिळणाऱ्या सुविधा:

1. रोख रक्कम काढणे (Cash Withdrawal)

2. पैसे जमा करणे (Cash Deposit)

3. नवीन बँक खाते उघडणे

4. DBT साठी खाते लिंक करणे

5. मोबाईल रिचार्ज / DTH सेवा

6. ATM कार्ड वापर व PIN जनरेशन

7. जीवन, आरोग्य व अपघाती विमा नोंदणी

8. FASTag खरेदी व खाते उघडणे

9. कर्जासाठी प्राथमिक अर्ज व मार्गदर्शन

योजनेचे फायदे:

1. गावमध्येच बँकिंग सेवा उपलब्ध.

2. प्रमाणिक आणि सुरक्षित व्यवहार.

3. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सोयीस्कर.

4. डिजिटल व्यवहाराची सवय लागते, ज्यामुळे आर्थिक व्यवहार पारदर्शक होतात.

भविष्यातील योजना:

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १०८१ रास्तभाव दुकाने आहेत. यापैकी उर्वरित १००२ दुकांनांमध्येही टप्प्याटप्प्याने मिनी बँक सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच, पुढील टप्प्यात सेवा गुणवत्तेत सुधारणा, दुकानदारांचे प्रशिक्षण आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात येतील.

ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल:

आता शिधा दुकानच आपल्या गावातील बँक बनणार आहे. सुरक्षित व्यवहार, कमी वेळेत सेवा, आणि सरकारी लाभ थेट खात्यात — या योजनेमुळे ग्रामीण नागरिकांचे जीवन अधिक सुलभ आणि सक्षम होणार आहे.

#Nandurbar#MiniBank#DigitalBanking#FinancialInclusion#AirtelPaymentsBank#BankingAtDoorstep#GraminVikas#DBT#JanDhanYojana#financialliteracy#DigitalIndia#MaharashtraDevelopment

error: Content is protected !!
Exit mobile version